Short Selling in Marathi | शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?

Short Selling in Marathi | शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?

Technical Mastarji
Technical Mastarji
5 min read

Short Selling in Marathi | शॉर्ट सेलिंगम्हणजे काय ?- मित्रांनो तुम्हीही सध्या खूप चर्चित असलेल्या हर्षद मेहेताची web series बघितली असेलच त्यात तुम्हाला share short करणे हि संकलपना माहित झालीच असेल मला असे वाटते हि हर्षद मेहेताची web seriesबघूनच तुम्ही आज गुगल वर Short Selling in Marathi बद्दल सर्च केले असेल .शॉर्ट सेलिंग करून पैसे कमवण्यासाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे शेअर्स आधीच खरेदी केले नसले पाहिजे आणि बाजार कोसळत असला पाहिजे ,तर कोसळत्या बाजारातसुद्धा पैसे कमावता येणे शक्य असते.

Download PDF Click Here

Short Selling म्हणजे काय ?

नेहमीच्या व्यवहारात share आधी कमी दराने खरेदी करून मग जास्त दराने विक्री करून पैसे कमवले जातात.

शॉर्ट सेलिंग (Short Selling in Marathi) मध्ये येथे नेमका उलटा व्यवहार असतो. हातात नसलेले शेअर्स आधी विकून मग स्वस्तात शेअर्स खरेदी करण्याच्या या व्यवहाराला 'शॉर्ट सेलिंग' म्हणतात.

(येथे तुम्हाला प्रश्न पडला असेल हातात नसलेले शेअर्स म्हणजे काय ? याचे उत्तर तुम्हाला पुढे मिळेल त्यासाठी संपूर्ण आर्टिकल नीट वाचा )

बाजार कोसळत असता आपण खरेदी-विक्रीचा नेहमीचा क्रम अशा प्रकारे उलटा करून पैसे मिळवू शकतो.

अटी दोनच! पहिली बाब म्हणजे, तुम्ही आधी शेअर्स खरेदी केलेले असता कामा नये आणि दुसरी अट म्हणजे व्यवहार फक्त इन्ट्रा-डे मध्येच केला पाहिजे.

Short Selling करतांना काही महत्वाच्या टिप्स
मुळात म्हणजे ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्हांला व्यवहार करायची इच्छा असेल त्या कंपनीच्या शेअर्सचा दर तेजीकडे झुकतो आहे की मंदीकडे याचे नीट निरीक्षण करा.मार्केट-बाँचवर किमान दहा-वीस व्यवहार पाहून हा निष्कर्ष काढा. यात घाई-गडबड करू नका. कारण।हा निष्कर्ष चुकला तर पुढचे सारेच गणित चुकण्याचा संभव असतो.समोर इंटरनेटवर मार्केट-वॉच पाहायची सोय नसेल, तर मात्र हा मार्ग चुकूनही अवलंबू नका. कारण सर्वच इन्टा-डे व्यवहारात शेअर्सच्या रिअल टाईम किमती अत्यंत महत्त्वाच्या असतात.

Discussion (0 comments)

0 comments

No comments yet. Be the first!