त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग पूजा

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग पूजा

trimbakeshwarorg
trimbakeshwarorg
17 min read

 

ज्योतिर्लिंगाचे महत्व

 शिव पुराणात  ज्योतिर्लिंग निर्मिती बाबत कथा सांगितली आहे. एके दिवशी ब्रह्मा आणि विष्णू यांचा मध्ये कोण श्रेष्ठ  या  विषयावरून वाद विवाद चालू होता. त्यांचा वाद इतका वाढला  कि ते आपली शस्त्रे देखील वापरू लागली त्यामुळे सर्वत्र त्रासदायक वातावरण निर्माण झाले होते. त्या दोगांमधील वाद शांत करण्यासाठी महादेव ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात त्यांचा समोर अवतरले होते. तेव्हा ते ज्योतिर्लिंग एक न संपणाऱ्या आगेचा ज्योतीप्रमाणे दिसत होते. तेव्हा महादेव पहिल्यांदा ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात अवतरले होते. त्यांचे ते अचंबित करणारे रूप पाहून ब्रह्मा देव आणि विष्णू देव आश्चर्यचकित झाले होते. त्या ज्योतिर्लिंग ची  सुरवात आणि शेवट शोधून काढण्यासाठी विष्णू देवाने वराह अवतार आणि ब्रह्मा देवाने हंसाचा अवतार धारण केला. पण दोघेही आपल्या कार्यात  अपयशी ठरले. 

भारतात ज्योतिर्लिंग ची १२ अतिप्राचीन मंदिरे आहेत. असे म्हणतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी महादेव स्वतः न संपणाऱ्या, आगी प्रमाणे दिसणाऱ्या प्रकाशस्तंभाचा स्वरूपात प्रकट झाले होते. यातीलच एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे.  त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या निर्मिती मागे हि अशीच एक खूप रोमांचक कथा आहे. 

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग : 

महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यातील त्र्यंबक नावाचा छोटाशा गावात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग चे मंदिर स्थित आहे. नाशिक मधील सह्याद्री पर्वत रांगेतील ब्रह्मगिरी पर्वताचा पायथ्याशी हे मंदिर बांधण्यात आले आहे. 1755-1786 AD मध्ये श्री नानासाहेब पेशवा यांनी हे मंदिर बांधले आहे. पूर्ण मंदिराचे बांधकाम हे काळ्या दगडाने झालेले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळूनच पवित्र गोदावरी वाहते. ब्रह्मागिरी पर्वत हे गोदावरी नदीचे प्रथम उगम स्थान आहे. तेथून गोदावरी लुप्त होऊन पुन्हा त्र्यंबकेश्वर मंदिर जवळील पवित्र कुशावर्त कुंड येथून उगम पावते. त्र्यंबकेश्वर चे ज्योतिर्लिंग हे इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा खूप वेगळे आहे. या ज्योतिर्लिंग ला ३ अंगठ्याचा आकाराचे होल आहे जे त्रिमूर्ती चे रूप मानले जाते त्यामुळे त्र्यंबक या नावाने या ज्योतिर्लिंगाला ओळखले जाते. त्र्यंबक म्हणजे त्रिमूर्ती चे प्रतीक असलेले ज्योतिर्लिंग १) ब्रह्मा २) विष्णू ३) महेश. गोदावरी नदी आणि महादेव चा ज्योतिर्लिंग ने पवित्र झालेली त्र्यंबकेश्वर मंदिराजवळील भूमी हि हिंदू धर्मातील पूजा, शुभ कार्य करण्यासाठी खूप लाभ दायक मानली जाते. दर वर्षी हजारो लोक येथे त्यांचा कुंडलीतील दोष निवारण करण्यासाठी येथे येतात. त्र्यंबकेश्वर येथील सर्व पूजा या ताम्रपत्रधारी पंडित करतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे केल्या जाणाऱ्या पूजा ह्या खूप लाभ दायक आणि तुम्हाला पूजेचा उत्तम अनुभव देणाऱ्या ठरतात. 

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, गोदावरी नदी आणि कुशावर्त कुंड यांची कथा 

गंगा नदीचा पवित्रते बद्दल तर सर्वांनाच माहित आहे. गंगा नदीला महादेवांनी आपल्या डोक्यावर धारण केले होते. त्र्यंबकेश्वर मध्ये गौतम ऋषींचे आश्रम होते. गौतम ऋषींना एकदा गौ हत्येचा पाप लागला होता. तो मिटवण्यासाठी गौतम ऋषींना गंगा नदीचा पाण्यात स्नान करून त्या पापातून मुक्ती हवी होती. तेव्हा गौतम ऋषींनी महादेवाची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले आणि गंगा धर्तीवर उतरवण्याची इच्छा व्यक्त केली होती.  तेव्हा गंगा नदी ला महादेवांनी धर्तीवर अवतरित केले. गंगा  नदी प्रथम ब्रह्मागिरी पर्वतावरून एक औदुंबराचा झाडाखालून उगम पावली होती. गंगा नदी ब्रह्मागिरी पर्वतावरून सारखी लुप्त व्हायची कारण तिला महादेवांना सोडून  धर्तीवर एकटे राहणे मान्य नव्हते. गौतम ऋषी गंगेचा लुप्त होण्या मुळे वैतागले होते त्यामुळे त्यांनी त्र्यंबक चा परिसरात कुशावर्त कुंड निर्माण केला आणि आपल्या मंत्रांचा साहाय्याने कुशावर्त कुंडात गंगेला आमंत्रित केले होते . गंगेने महादेवाकडे तिच्यासोबत धर्तीवर येण्याची इच्छा व्यक्त केली होती. महादेवांनी गंगानदीची इच्छा मान्य केली आणि ते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात धर्तीवर अवतरित झाले होते. कुशावर्त कुंड त्र्यंबकेश्वर चा मंदिर पासून ४०० किलोमीटर चा अंतरावर आहे. 

कुशावर्त कुंडाचा पवित्र पाण्यात आपले पाप धुण्यासाठी आजही लोक लांबून त्र्यंबकेश्वर मध्ये येतात. त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या सर्व पूजा कुशावर्त कुंडातील पवित्र पाण्यात स्नान करूनच सुरु होतात. रामायणाचा काळात राम देव त्यांचे वडील दशरथ यांचे श्राद्ध विधी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे आले होते. 

त्र्यंबकेश्वर येथे केल्या जाणाऱ्या पूजा : 

१) काल सर्प दोष :

काल सर्प दोष हा माणसाचा आयुष्यात नकारात्मकता निर्माण करणारा आणि माणसाचे सौख्या, सुख, यश यांमध्ये अडथळे निर्माण करणारा दोष आहे. काल सर्प दोषाचा निवारण साठी त्र्यंबकेश्वर मध्ये काल सर्प दोष पूजा केली जाते. एकूण १२ प्रकारचे काल सर्प दोष ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत. तुमचा कुंडलीतील ग्रहस्थितीवरून ताम्रपत्रधारी पंडित तुम्हाला सांगतील कि तुम्हाला कोणता काल सर्प दोष आहे त्यानुसार योग्य तो मुहूर्त काडून त्र्यंबकेश्वर चा परिसरात तुमची काल सर्प दोष शांती पूजा केली जाईल. 

२) नारायण नागबली पूजा : 

नारायण नागबली हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा ३ दिवसांचा विधी फक्त त्र्यंबकेश्वर जवळींल अहिल्या गोदावरी संगम, सती महास्मशान येथेच केला जातो. नारायण नागबली विधी मुख्यतः पितृ दोष निवारणासाठी केला जातो. आपल्या पूर्वजांचा आत्म्यांना शांती मिळून देणे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्ती साठी नारायण नागबली विधी फार महत्वाचा मानला जातो. नारायण नागबली विधी साठी पितृ पक्ष हा स्वर्वोत्तम मुहूर्त मानला जातो.  नारायण नागबली पूजा करण्यासाठी ताम्रपत्रधारी पंडित तुमहाला पूजेचा योग्य तो मुहूर्त सांगतील. 

३) त्रिपिंडी श्राद्ध पूजा : 

त्रिपिंडी श्राद्ध पूजा हि आपल्या पितरांसाठी केली जाणारी पिंड दान विधी असते. एखाद्या व्यक्तिचा  मरणानंतर त्याचे दर वर्षी श्राद्ध विधी होणे म्हणत्वाचे असते. असे न झाल्यास त्या व्यक्तीचा आत्म्याला मोक्ष प्राप्ती होत नाही. त्रिपिंडी श्राद्ध पूजा हि आपल्या पूर्वजांचा अतृप्त भटकत राहणाऱ्या आत्म्यांना स्वर्गात पाठवण्यासाठी करणे फार महत्वाची असते. त्रिपिंडी श्राद्ध पूजा करण्यासाठी जवळ एक पवित्र नदी असणे महत्वाचे असते. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा तीरावर केली जाणारी त्रिपींडीची श्राद्ध पूजा हि लवकर फळ देणारी ठरते. 

४) रुद्राभिषेक, महाम्रीत्युन्जय मंत्र जाप, कुंभ विवाह : 

त्र्यंबकेश्वर येथे रुद्राभिषेक पूजा, महाम्रीत्युन्जय मंत्र जाप पूजा आणि कुंभ विवाह फार मोठ्या प्रमाणात केल्या जातात. त्र्यंबकेश्वर येथील रुद्राभिषेक पूजा थेट मूळ ज्योतिर्लिंगाच्या ठिकणी होत असल्याने तुम्हाला पूजेची प्रेबूकींग करणे फार महत्वाचे आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान चा ऑफिसिअल वेबसाइट वरून तुम्ही तुमची पूजा आणि ताम्रपत्रधारी पंडित बुक करू शकता. 

त्र्यंबकेश्वर येथे केल्या जाणाऱ्या इतर पूजा :

 लघु रुद्राभिषेक , महा रुद्राभिषेक, अति रुद्राभिषेक , जल अभिषेक, महा शिवरात्री पूजन, रुद्र चमकाम यज्ञ, एकवस्त्रींस्नान, विष्णुबली, सोळा सोमवार उद्यापन, सर्व नक्षत्र शांती, नवग्रह शांती पूजा, योग शांती पूजा, कारण शांती पूजा. 







Discussion (0 comments)

0 comments

No comments yet. Be the first!