1. Personal

Marathi Movie Review : Baapjanma

Disclaimer: This is a user generated content submitted by a member of the WriteUpCafe Community. The views and writings here reflect that of the author and not of WriteUpCafe. If you have any complaints regarding this post kindly report it to us.



बापजन्म – जीवन जगण्याचा, आपली जवाबदारी निभवण्याचा आणि  त्यात संतुष्टी घेण्याचा धडा शिकवणारी एक विलक्षण गोष्टं आहेे.  हा  एक खरंच अदभुद  चित्रपट आहे ,  आणि  खूप खूप प्रेमानी  मांडलेली कहाणी  आहे. एक अशी  गोष्टं जी  तुमच्या मनाला व अंतर्मनाला बांधून ठेवेल आप्ल्यात … जिला वसरणं इतकी सोपी गोष्टं नाही . तुम्हाला ह्याला पुन्हा पुन्हा बघायची खूपच तीव्र इछा राहील. मन भरणारच नाही फक्त एकदा बघून… कमीत कमी मी तर ह्या मनमोहक चित्रपटाला  बघून स्तब्ध झालो!

ह्या चित्रपटाची गोष्टं मात्र खूप सादी आहे : इथे अपलयाला पुन्हा स्टोरी आणि स्क्रिप्ट चा फरक कळतो. अजूनेक बिंदू असा आहे कि स्टोरी ची सेटिंग पण किती महत्वाचा असतो हे समजतं ह्या अतिसुंदर चित्रपटातून . अश्या गोष्टी जणू कितीदा   सांगितल्या  गेल्या आहेत अजून पर्यंत – पण ह्या चित्रपटाची ओढ विलक्षणच आहे, माझ्या मते ह्यात काहीच वाद नाही ! आणि ह्या सगळ्या बरोबर जर उत्तम अभिनय भघायला मिळाला – अजून काय हवं? इंग्रजी ची एक म्हण आहे – icing on the cake:  म्हणजे संगीत. गाणी फक्त दोन पण स्क्रिप्ट मध्ये अश्या सुरेख तरीक्याने गुंतवून दिली आहे कि बघायला मजा पण येतो आणि संगीताचा रसही पूर्णपणे घेता येतो.

गोष्टीला तुम्ही एक माळ समजावं : डोरी आहे नात्यांची, एका निवृत्त झालेल्या सरकारी ऑफिसर च्या परिस्थिती मुळे  एकटा  राहण्याऱ्या माणसाच्या जीवनाची, आणि तो कसं  सगळ्यांना परत आपल्या जवळ आणतो. ह्या डोरी मध्ये मणी  किंव्हा फुलं  म्हणजे स्क्रिप्ट व सेटिंग, जे ह्या साध्या गोष्टीला उभारतात: सर्वप्रथम हा माणूस {शेखर} RAW हुन निवृत्त झालेला अधिकारी आहे, एक उत्कृष्ट गुप्तचर. दुसरा बिंदू: त्याच्या कुटुंबाला  ह्याची काहीच कल्पना नाही – त्यांच्या साठी तर तो एक साधा माणूस, स्वतःचा business करणारा . हे झालं कहाणी चं सेटिंग.

आता तिसरा महत्वपूर्ण बिंदू: स्क्रिप्ट आणि कहाणी चा फरक. प्रेसेंटेशन अगदी विलक्षण; ह्या सम्पूर्ण प्रकरणाला दाखवलं आहे एक व्यंग्य किंव्हा कॉमेडी च्या दृष्टिकोनाने! मजा अशी की हे कुठेही विचित्र वाटत नाही, सेटिंग मुळे खूप नैसर्गिक [natural} वाटतं. चौथा बिंदू: संवाद – सगळ्या पात्रांचे आपसात संवाद बघण्या व ऐकण्या सारखे आहे. हंपी मध्ये संवाद कमी ठेवले होते – इथे संवाद भरपूर आहे पण  गोड सुमधुर व सौम्य. जर जुन्या गोष्टीला नवीन रूपामध्ये पुढे ठेवायचं आहे तर वेगळेपण असायलाच हवा; हा वेगळेपणा फक्त एका बिंदू मध्ये ठेवून पुरणार नाही – चित्रपटात तारतम्य येणार नाही. स्टोरी, स्क्रिप्ट, पात्र, सेटिंग, संवाद सगळ्यात तारतम्य हवं, तालमेल हवा आणि परस्पर सम्बन्ध तर नक्की  हवा. सगळं मिळून एक सुरेख फुलांची सुंदर माळ तयार झाली पायजे!

आता पात्रांकडे लक्ष्य करूया : सगळ्या पात्रांची रूपरेखा उत्कृष्ट मांडली  आहे लेखकाने. दरेक पात्राचे  सम्पूर्ण चित्रण नैसर्गिक आणि खरं वाटतं. खऱ्या जगातही हि लोकं जर भेटली तर अशीच असतील, व अशीच वागतील असं वाटतं बघताना. अर्थ असा कि काल्पनिक जगाचं आणि खऱ्या जगाचं फरक संपतो बघताना.   अशी कहाणी मांडणं काही सोपी गोष्टं न्हवे; एखाद दोनच चित्रपट मनात येतात. ती अपण बोटांवर मोजू शकू! उरलं काय तर ते निर्देशन . एवढं बोलल्या नंतर मला तरी असं वाटत नाही कि निर्देशन बद्दल काही सांगायची गरज उरली असेल! शेवटी निर्देशकच सगळ्या फुलांना वेचून प्रेमाने एक एक करून दोरी पेरतो, आणि एक माळरूपी विलक्षण अव्हिसमरणीय कलाकृती तयार करतो!

वाचताना लक्ष्य गेलं असेल कि मी कोणच्याही  कलाकाराबद्दल काहीच टिप्पणी केली नाही – माझ्या मताने हे विश्लेषण करायची आवश्यकता नाही . ह्या उत्कृष्ट चित्रपटाला एक पूर्ण माळ च्या रूपांमध्ये बघितलं पायजे. कुणी एक नाही जेनी सुंदर अभिनय केला, आणि सगळ्या बाकी कलाकार लोकाहून पुढे दिसला. सगळे पात्र एका माळ मध्ये पेरलेले खरे उभारले गेले त्यांच्या अभिनय च्या जादू ने. सगळ्यांमध्ये खूप सुरेख तारतम्य जमून आलं; म्हणून मी कोणा एकाला वेचून सांगण्याचा इच्छुक नाही; तरीपण एका ओळीत या दोनच शब्दानं सांगतो  : सचिन खेडेकर. इतकं वर्णन पुरे.

तर हा झाला उल्लेख, किंव्हा पुनरावलोकन आहे ह्या उत्कृष्ट चित्रपटाचा. एक खूपच प्रेमाने मांडलेली विलक्षण कहाणी, ज्याच्यात एक एक सीन व एकेक दृश्य,  दरेक  पात्र व एकेक संवाद खूप विचार करून एका माळ मध्ये  पेरून ठेवला आहे. खूप दिवसां नंतर असा सुरेख प्रेमळ चित्रपट बघितलं  – मला माघे प्रेमाची गोष्टं पर्यंत जावं लागलं असं दुसरं चित्रपट शोधायला. एक दुर्लभ निर्मळ सुंदर कलाकृती ज्याला बघून मनाचा रोमरोम मंत्रमुग्ध हुन जातो – बघताना तुम्ही सुद्धा त्याला माळ मध्ये  स्वतःहून पेरले जाता आणि एकजीव होता … पुन्हा पुन्हा बघायची तीव्र इच्छा आकार घेते मनात!

http://feeds.feedburner.com/blogspot/ffxzG

Login

Welcome to WriteUpCafe Community

Join our community to engage with fellow bloggers and increase the visibility of your blog.
Join WriteUpCafe